भ्रमंती

भ्रमंती

सुरेख कोरीवकाम असलेली " दमडी मस्जिद "

दगडात कोरलेल्या सुंदर व पवित्र ग्रंथातील अध्याय पाहिल्या पाहिजेत अस वाटतंय तर बुरहानगरच्या वाटेवर असलेल्या 'दमडी मस्जिद' ला भेट दिलीच पाहिजे. दमडी म्हणजे सर्वात कमी किमतीचे नाणे.अहमदनगर च्या किल्ल्याच बांधकाम चालू असताना मजुरांपैकी एक फकीर (संत) यांना तिथले लोक दमडी देत ​​असे. फकीरने दमडी दमडी गोळा केली व ही मस्जिद शेरखान (साहिल खान) यांनी बांधली, तीच मस्जिद दमडी मस्जिद म्हणून ओळखली जाते १५६७ मध्ये बांधलेली ही वास्तुकला निजामशाहीच्या कला आणि संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

केवळ दगड आणि चुनखडीचा वापर करून इस्लामिक स्थापत्य शैलीचा वापर करून बांधलेली मस्जिद सुलेख आणि दगडी कोरीव कामांसाठी आशिया खंडातील प्रथम दहा मस्जिद पैकी एक मानली जाते. या मस्जिदच्या पुढील बाजूस, आतील बाजूस आणि मिनार वर सुंदर कमळाचे कोरीव काम सापडते.

मीनार ही  किल्ल्याची प्रतिकृती आहे मस्जिदच्या आतील समोरच्या भिंतीवर कुराणचे सुंदर सुलेखन दिसते जे केवळ एक कुशल कलाकार च घडवू शकतात 

दमडी मस्जिदचे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला घुमट नसून दगडी छप्पर. येथे आपण बहुधा सपाट छप्पर शोधू शकता. शेकडो किलो दगड एकमेकांशी इतके स्थिर आणि संतुलित कसे राहतात हे नेहमीच एक रहस्य आहे. त्याशिवाय मजल्यावरील फरशा आणि छताची रचना अशी आहे की त्या एकमेकांना प्रतिबिंबित करतात पण इस्लामी स्थापत्य शैलीचा भाग म्हणून वर एक आभासी घुमट बनवला गेला आहे. 

लेखक, छायाचित्र - राजेंद्र बुलबुले Post a Comment

0 Comments