पावसाने दाणादाण ....
ढगफुटी सदृश पाऊस,सखल भाग जलमय
नगर दि.०३ - दिवसभराच्या ऊन सावलीच्या खेळानंतर संध्याकाळी ५ च्या दरम्यान अचानक अंधारून आलं आणि जोरदार पावसाला सुरवात झाली सुमारे तासभर झालेल्या पावसाचा जोर इतका होता कि दहा मिनिटातच शहराच्या सखल भागातील रस्ते वाहते झाले जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था निर्माण झाली.याच पाऊसाने अक्षरक्ष: नगरकरांची दाणा-दाण उडवली.
काही मिनिटातच शहरभर गुडघ्याइतके पाणी साठले पाऊस आणि वाऱ्याचा एवढा जोर होता कि आडते बाजार भागातील तेलाची रिकामी पिंप हि पाण्याबरोबर वाहून थेट चितळे रस्त्यापर्यंत आली रस्त्यावरची उभ्या केलेल्या दुचाक्यांहि पाण्याबरोबर वाहून जायला लागल्या.
सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान पाऊस थांबल्यानंतरही बराच वेळ पाणी वाहत होते. पटवर्धनचौकातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले होते.पावसाळा संपत आला तरी शहरातील नाले सफाई न झाल्याने पूर्ण पावसाळा नगरकरांना रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा सामना करत करतच काढावा लागला शहरातील सखल भागातील पाण्याचा निचरा रात्री ८ वाजे पर्यंत झालेला नव्हता.
शहरात पाऊस सुरु झाल्या बरोबर नेहेमी प्रमाणे याही वेळी वीज घालवण्यात आली मात्र ६.४५ च्या दरम्यान पाऊस थांबल्यावर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. आजच्या पावसच रूप एवढं रुद्र होत पाऊस झाल्याबरोबर काही मिनिटातच पाण्याची लोंढे वाहु लागले कि यातून नागरिकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही अनेकांनी खरेदी केलेल्या वस्तूंसह दुचाक्या उभ्याकेल्या होत्या त्याही वाहून गेल्याने अनेकांचे नुकसान झाले.
0 Comments