तो बॉम्ब ४९वर्षांपूर्वीच्या विमान दुर्घटनेतीलच
प्रकाश भंडारे यांनी जागविल्या "त्या" घटनेच्या आठवणी
वेब टीम नगर दि.२१ - भाळवणी जवळील भांडगाव टेकडीला धडकून एक लष्करी विमान अपघात ग्रस्त झाले त्यात लष्कराच्या २ वरिष्ठ अधिकार्यांसह १३ जण मृत्यमुखी पडल्याच्या घटनेला उणीपुरी ४९ वर्षे झाली असून काळ सापडलेला जिवंत बॉम्ब हा त्याच घटनेच्या वेळे चा असावा असा अंदाज जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांनी व्यक्त केला. त्यावेळी गावकरी दैनिकात कार्यरत असलेल्या प्रकाश भंडारे सायंकाळच्या सुमारास घरी जात असताना नगर पारनेर रस्त्यावर भालावणीच्या दिशेकडून आगीचे व धुराचे लोळ दिसल्याची आठवण सांगताना पुन्हा रात्री कार्यालयात आल्यावर विमान अपघातग्रस्त झाल्याची बातमी त्यांना मिळाली . दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रकाश भंडारे आपल्या सायकलवरून भांडगाव टेकडीवर पोहोचले सायंकाळच्या वेळी अपघात झाल्याने अपघातातीळ मृतांच्या रक्तामांसाचे थारोळे आणि अति उष्णतेने पघळलेल्या विमानाच्या अल्युमिनियमचे पाट वाहिल्याचे त्यांनी पाहिल्याचे सांगितले त्यावेळी विखुरलेल्या विमानाच्या अवशेषांबरोबरच हा बॉम्बही पडला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला .
या विमान अपघातानंतर रशियन लष्करी अधिकारी ए.एफ.जे गामा यांनीही घटनास्थळी भेट दिली होती असेही प्रकाश भंडारे यांनी त्यावेळी ३००शब्दांचा मजकूर तारेने गावकरीच्या मुख्यालयास पाठवून सर्वात मोठी बातमी गावकरीने छापल्याची आठवणही प्रकाश भंडारे यांनी सांगितली. काल म्हणजे दि. २० मे रोजी डॉ. संजय बांडे दाम्पत्याला रशियन बनावटीच्या जिवंत बॉम्ब सापडल्याच्या घटनेवरून त्यांनी १६ ऑगस्ट १९७१ रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेला उजाळा दिला.
0 Comments