दोन लाख सहजयोगींची ऑनलाईन ध्यानसाधना

दोन लाख सहजयोगींची ऑनलाईन ध्यानसाधना

जगातील ५९ देशातील साधकांचा सहभाग: सकाळ-संध्याकाळ विश्वकल्याणाची प्रार्थना

वेब टीम नगर ,दि. १६- कोरोनाच्या दहशतीने अख्खं जग लॉकडाऊन झाले असून लोकांमध्ये भिती, चिंता व नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प.पू  श्रीमाताजी निर्मला देवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून जगातील ५९ देशातील दोन लाख साधक रोज सकाळ,संध्याकाळ एकाच वेळी घरातून ऑनलाईन साधना करत आहे. या ध्यानसाधनेतून विश्वकल्याणाची प्रार्थना सामुहिकपणे करत आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव  वाढल्याने जग लॉक डाऊन झाले आहे. त्यामुळे जनमाणसात असुरक्षितता, अस्वस्थता, नैराश्य, भिती व भविष्याची चिंता निर्माण झालेली आहे. कोरोनामुळे  प.पू. श्रीमाताजी निर्मला देवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यानसाधनेच्या माध्यमातून गत ५० वर्षात असंख्य साधकांना या नकारात्मक व नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होत आहे. आरोग्यशांती, समाधान व आनंद प्राप्त होऊन लोकांना संतुलीत जीवन जगण्याचा मार्ग यातून मिळत आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळात जगातील ५९ देशातील सुमारे दोन  लाख साधक दररोज सकाळी साडेपाच व सायंकाळी सात वाजता आपल्या घरातूनच ऑनलाईन ध्यानसाधना  करत आहेत. त्या साधनेमधून विश्वकल्याणाची प्रार्थना सामुहिकपणे केली जात आहे. ध्यानधारणा व सुमाहिक प्रार्थनेच्या माध्यमातून निर्माण होणाºया सकारात्मक चैतन्य लहरीतून संसर्गजन्य विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल अशी माहिती प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवी सहजयोग टस्ट्रचे उपाध्यक्ष दिनेश राय यांनी दिली. कोरोनामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता, अस्वस्थता, नैराश्य, भिती व भविष्याची चिंता यावर मात करण्यासाठी या सामुहिक ध्यानधारणेचा फायदा होत असल्याचे ते म्हणाले.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते याची प्रचिती नियमीत ध्यानधारणा करणारे साधक अनुभव घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सगळेच आपापल्या घरी बंदिस्त आहे, अशावेळी साधकांना आपल्या आतंरिक शक्तीची जाणीव होण्यासाठी दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत सहजयोग ध्यानसाधना शिकविली जात आहे. यू ट्यूबच्या माध्यमातून हजारो साधक त्याचा लाभ  घेत आहे.नवीन साधकांसाठी टोल फ्री क्रमांक १८००३०७००८०० कार्यरत आहे. या क्रमांकावर फोन करणाºया सुमारे २ हजार जणांना या ध्यान पध्दतीची माहिती मिळत आहे.
विश्वात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत जीवनास नवीन मार्ग दाखविणारा सकारात्मक उर्जा प्रदान करणारा सहजयोग ध्यानधारणेचा हा मार्ग  ऑनलाईनच्या माध्यमातून घराघरात पोहचत असून नवीन साधकांना मार्गदर्शन करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाने जगभरात सामुहिक सहज ध्यानाचा हा अनोखा मार्ग सगळ्यांना उपलब्ध झाला आहे.
या ध्यानामुळे लोकांचे शारीरिक, मानसिक,भावनिक तसेच अध्यात्मिक आरोग्य सुधारते. लोकांमधील तणाव व चिंता दूर होण्यास मदत होते,असे सहजयोग राज्य प्रमुख स्वप्नील धायडे यांनी सांगितले. जगभरातील लोकांना याच लाभ  मिळावा यासाठी यु ट्यूबवरील ध्यानसाधनेच्या सामुहिक सत्राला उपस्थितीत असलेल्या साधकांनी प्रत्येक सत्राचे स्थानिक भाषेत भाषांतर केले आहे. लोकांमधील कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी व आत्मसाक्षात्काराची प्राप्ती व्हावी या हेतूने सहजयोगी साधकांनी हा उपक्रम राबविला आहे. ही ध्यानधारणा विनामुल्य असून यू ट्यूब,फेसबुक या सोशल मिडियावर थेट लाईव्ह तसेच मिक्स एलआर रेडिओ आणि नॅशनल  टिव्हीचा वापर ध्यानसाधनेसाठी वापर केला जात आहे.
.....................................
१ हजार ३४४ ध्यानकेंद्र
राज्यातील १ हजार ३४४ ध्यानकेंद्र आणि तेथील सहजयोगी साधक १५ मार्चपासून प्रशासनाच्या निर्णयाप्रमाणे सोशल डिन्सिंटगचे नियम पाळत आहेत. सहजयोग संस्थापिका श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी १९८० साली संपूर्ण विश्वावर जेव्हा आपत्ती येईल तेव्हा विज्ञान व दैवीज्ञान एकत्र येवून जगाला संकटातून बाहेर काढेल असे सांगितले होते. त्यानुसार सहजयोग परिवार सज्ज असून नागरिकांना विनामुल्य ध्यान ऑनलाईनच्या माध्यमातून शिकविले जात आहे. नागरिकांनी विनाशुल्क टोल फ्री नंबरचा वापर करून ध्यानसाधना आत्मसात करावी. लॉकडाऊन काळात लोकांनी निराश न होता, आपले आत्मिक बळ वाढवावे असे आवाहन राज्य सहजयोग सदस्य श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments