डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आकाशवाणी वर विशेष कार्यक्रम सुधारीत वेळेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आकाशवाणी वर विशेष कार्यक्रम  सुधारीत वेळेत  





वेब टीम नगर,दि.१२ - भारतातील बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते, जागतिक कीर्तीचे महामानव , भारतीय घटनेचे शिल्पकार , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आकाशवाणी एफ.एम १००. १ वर विशेष कार्यक्रम सादर होणार होता. मात्र याच वेळी मा. पंतप्रधानांचे भाषण होणार असल्याने या कार्यक्रमाची वेळा बदलण्यात आली असून आता हा कार्यक्रम सकाळी ९वा. १० मिनिटांपासून ९वा. ३० मिनिटांपर्यंत प्रसारित होणार असल्याची  माहिती लेखिका सुषमा अमर (पत्रकार ,कॉम्रेड भास्करराव जाधव  यांची कन्या ) यांनी दिली  आहे.१४ एप्रिल रोजी सकाळी ९. १०ते ९. ३०पर्यंत सादर होणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार , वृत्तपत्रकार छायाचित्रकार प्रकाश भंडारे, फाय फाऊंडेशन पुरस्कार विजेते , जेष्ठ चित्रकार व कवी शिधर अंभोरे आणि न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स च्या संज्ञापन विभागाचे सहाय्य्क प्राध्यापक बापू चंदनशिवे यांचा सहभाग असणारा हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे . 

Post a Comment

0 Comments