महाराष्ट्रातील जेष्ठ संपादक , पत्रकार व वृत्तपत्रांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

महाराष्ट्रातील जेष्ठ संपादक , पत्रकार , 

वृत्तपत्रांचा कृतज्ञता सन्मान सोहळा 


    वेब टीम नगर,दि.११-  महाराष्ट्राला पत्रकारितेची फार मोठी परंपरा लाभली आहे. अनेक वृत्तपत्रांनी समाज परिवर्तनासाठी संघर्ष लढे दिले आहेत. पत्रकारिता हे सेवेचे व प्रबोधनाचे साधन म्हणून वर्षानुवर्षे जनतेची सेवा करणाऱ्या जेष्ठ संपादक पत्रकार व वृत्तपत्रांचा कृतज्ञता सन्मान संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र , मुंबई  या संस्थेने करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील थोर व दिवंगत संपादक व पत्रकारांच्या नावाने हे कृतज्ञता सन्मान केले जाणार आहेत.महाराष्ट्रातील महसूल विभागानुसार प्रत्येक विभागातील पात्र निकषा नुसार हे कृतज्ञता सन्मान सोहळे होणार असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे व राज्य प्रकल्प प्रमुख प्रकाश भंडारे यांनी दिली आहे.

प्रत्येक महसूल विभागातील वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे व किमान २५ वर्षे पत्रकारिता केलेल्या संपादक, पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे  नियमित प्रकाशनाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांच्या संपादक , मालक ,  छायाचित्रकार , व्यंगचित्रकार , प्रतिनिधींचा सन्मान या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक संपादक - पत्रकार आयुष्यभर पत्रकारितेत , सामाजिक सेवेत असतात मात्र त्यांच्या या कार्याचा सन्मान होतोच असे नाही. संपादक व पत्रकार सेवा संघ  महाराष्ट्र , मुंबई हि संस्था सामाजिक कृतज्ञता भावनेतून हे सन्मान करणार आहे. कृतज्ञता सन्मान सोहोळा  निकषास पात्र असणाऱ्या संपादकांनी त्यांची माहिती १ मे २०२० पर्यंत पोस्टाने अथवा इ-मेल वर पाठवावी.माहिती पाठवताना संपादक - पत्रकारांचा फोटो , अल्प परिचय संबंधीत वृत्तपत्राच्या २ प्रति पाठवाव्यात. ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी किंवा १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी हे कृतज्ञता सन्मान सोहोळे आयोजित करण्याचे नियोजन आहे. रोख रक्कम , सन्मानपत्र , महावस्त्र , स्मृतीचिन्ह या प्रकारचे सन्मान स्वरूप आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या ५०-६० वयोगटातील संपादक - पत्रकारांनी त्यांच्या विभागातील जेष्ठ संपादक - पत्रकारांच्या शिफारसी केल्यास त्या स्विकारल्या जातील. परीक्षण मंडळाच्या निकषातून निवड झालेल्या सन्मान मूर्तींची नावे अखेर पर्यंत जाहीर केली जातील.

माहिती पाठविण्यासाठी पत्ता -
मा.अध्यक्ष,
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र,मुंबई
द्वारा - दैनिक युवावार्ता कार्यालय,संगमनेर ४२२६०५ जि- अ.नगर

इ-मेल - mahasevasangh@gmail.com / dailyyuvavarta@gmail.com

               

Post a Comment

0 Comments