केंद्र सरकारच कोरोना पॅकेज

केंद्र सरकारच कोरोना पॅकेज

केंद्र सरकारच कोरोना पॅकेजआठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार, मोदींचं 'कोरोना पॅकेज' जाहीर

वेब टीम नवी दिल्ली ,दि.२६-देश लॉक डाऊन मधून जात असतांना या  काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी १ लाख ७० हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पुढील तीन महिने गरिबांना ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. आठ कोटी कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात ५०० रुपये, शेतकऱ्यांना २ हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या घोषणा

१. केंद्र सरकारचे १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज
२. वैद्यकीय कर्मचा-यांना ३ महिन्यांसाठी ५० लाखांच्या विम्याचे कवच
३. देशात कोणही उपाशी राहणार नाही
४. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
५. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
६. अन्न कल्याण योजनेंतर्गत, १० किलो गहू, १० किलो तांदूळ,१ किलो दाळ मोफत
७. ८० कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
८. आठ कोटी ८० लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रु.लगेच देणार
९. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर २ हजार रु. टाकणार
१०. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
११. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत १८२ वरुन २०२ रु.पर्यंत वाढ, ५ कोटींना फायदा
१२. तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना १ हजार रु.सानुग्रह अनुदान
१३. दिव्यांगांना १ हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान
१४. जनधन खाते असलेल्या २० कोटी महिलांना ३ महिने ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान
१५. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ३ महिने मोफत गॅस सिलिंडर
१६. आठ कोटी ३० लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ३ महिने मोफत सिलिंडर
१७ . ६३ लाख बचत गटांना १० ऐवजी २० लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, ७ कोटी कुटुंबांना लाभ
१८. १०० पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील१५हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार ३ महिने भरणार

Post a Comment

0 Comments