२१ दिवस भारत बंद

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी   संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन 

पंतप्रधानांचे आवाहन  वेब टीम नवी दिल्ली ,दि. २४- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी  आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं जात आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, “आज रात्री १२ वाजल्यापासून पूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होत आहे. भारताला वाचवण्यासाठी, भारताच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून घरातून बाहेर निघण्यावर बंदी आहे. देशातील प्रत्येक राज्याला, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला, जिल्हा, गाव, गल्ली प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे.”

कोरोनाच्या जागतिक महामारीला तुम्ही बघत आणि ऐकत आहात. कोरोनाने मोठमोठ्या देशांना असाहाय्य केलं आहे. ते देश प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना संसाधनांची कमी आहे, असंही नाही. मात्र कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती भीषण होत चालली आहे. तज्ज्ञही तेच सांगत आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी याशिवाय कोणताच पर्याय नाही. कोरोनाला रोखायचं असेल तर त्याच्या संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. काही लोक या गैरसमजात आहेत की, सोशल डिस्टंन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे. मात्र, ते चूक आहे. हे प्रत्येकासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोकांचे चुकीचे विचार तुम्हाला, परिवाराला आणि पुढे पूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकतील. पुढे असेच चालू राहिलं तर भारताला मोठा फटका बसेल, असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments