रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरणरक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण


     वेब टीम नगर,दि. १६ - एकाचवेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी  मोगल, इंग्रज, डच व आप्तेष्ट यांच्याशी संघर्ष करत स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कधीही, कोणीही विसरु नये. श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांच्या स्मृती जागृत रहाव्यात, यासाठी  बलिदान मास पाळण्यात येतो. यावेळी श्रीशिव प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते विविध गोष्टींचा त्याग करुन महिनाभर सुतक पाळतात. नगरमध्येही अनेक वर्षांपासून बलिदान मास पाळला जात आहे. यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करुन युवकांनी त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे प्रतिपादन श्रीशिव प्रतिष्ठानच्या नगर शाखेचे जिल्हाप्रमुख  बापू ठाणगे यांनी केले.

     धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या नगर शाखेच्यावतीने बलिदान मास पाळला जात आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 40 युवकांनी रक्तदान केले. यावेळी बापू ठाणगे मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमास संतोष टेकाळे, प्रविण पैठणकर, विनोद काशिद, आशिष क्षीरसागर, साई भोरे, निलेश चव्हाण, अजय सुकटकर, पवन आहेर, मंगेश शेटे, किशोर बेद्रे आदिंसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

     श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने बलिदान मासाचा समारोप दि.२४ मार्च सायं.५ वा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी वाडिया पार्क येथून मुकपदयात्रा काढण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments