भारतातही कोरोना ,२९ जणांना झाली बाधा ;महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही


भारतातही कोरोना ,२९ जणांना झाली बाधा ;

महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही

वेब टीम नवी दिल्ली ,दि. ५ जगभरात हैदोस घालणारा कोरोना आता भारतातही दाखल झाला आहे. भारत २९ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं असून त्यातील  ३ जण बरे झाले असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी सांगितले की, 'भारतातील कोरोना बाधितांची संख्या २९ झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी ७ राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, केरल, तेलंगाना, राजस्थान आणि हरियाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कोरोणाती बाधा झालेले संशयित किंवा लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत.
भारतामध्ये या शहरांमधील लोकांना कोरोना व्हायरसची बाधा
एकूण प्रकरणं : २९
दिल्ली : १७
केरळ : ३
तेलंगणा : १
जयपूर : १
आग्रा : ६
गुरुग्राम : १
भारत कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहे का?
केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कोरोनासी लढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संशयितांच्या तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा सज्ज आहेत. गरज भासल्यास ५० प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीही सज्ज आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा असून डॉक्टर्स संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोनासाठी एक हेल्पलाइन नंबर - ०११-२३९७८०४६ जारी करण्यात आला आहे.

 महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, राज्य शासनाकडून खबरदारीची उपाययोजना, चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे
८१ देशात करोना व्हायरसचे थैमान

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत ३२०० लोकांचा  मृत्यू झाला
 आहे. १२ जानेवारी पर्यंत फक्त चीन कोरोना व्हायरसशी लढत होता. परंतु आता महिन्यात कोरोना व्हायरस ८१ देशांत पसरला आहे. मागील पाच दिवसात कोरोना व्हायरस २२ देशांत पसरला आहे. भारतात कोरोना व्हायरस जानेवारी महिन्यात दाखल झाला होता
रुग्णालयांना स्वतंत्र वॉर्ड बनवण्याचा आदेश
देशातील सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश याआधीही रुग्णालयांना देण्यात आला होता. सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावाही घेतला, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.Post a Comment

0 Comments