पंजाबी- शीख समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा १२ एप्रिलला




 पंजाबी- शीख समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा १२ एप्रिलला 


वेब टीम नगर,दि. ३ –  पंजाबी सेवा समिती ट्रस्टच्या वतीने पंजाबी व शीख समाजातील वधु- वरांच्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायं. ५वाजेपर्यंत या वेळेत मनमाड रोडवरील हॉटेल संजोग येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी ३१ मार्च पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी यांनी दिली.
वधू- वर मेळाव्याचे हे चौथे वर्ष असून आजच्या नवयुगात प्रत्येकाला आपल्या जीवनसाथीची योग्य निवड करता यावी व अचूक योग्य सर्व माहिती मिळवता यावी. ही बाब लक्षात घेऊन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी झालेल्या तीन मेळाव्यांना संपूर्ण राज्यासह इतर राज्यांमधूनही उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत शेकडो विवाह या मेळाव्याच्या माध्यामातून जुळले आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष हितेश ओबेरॉय यांनी दिली.
या वधु-वर परिचय मेळाव्यात नव विवाह इच्छुक वधू वरां बरोबरच विधवा, विदुर, दिव्यांग उमेदवारांनाही भाग घेता येणार आहे. सर्व इच्छुकांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून ३१ मार्च  पर्यंत फॉर्म भरणे आवश्यक आहे.  मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या सोबत वधु वरांना आणणे जरुरीचे आहे.
          अधिक माहितीसाठी व अर्ज मिळण्यासाठी पंजाबी सेवा समिती (ट्रस्ट) मॅरेज ब्युरो कार्यालय, पंजाबी सभा हॉल, इंदिरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर. विनोद दिवाण मो.९६५७६०३८५०, सुनिल सहानी (सुनिल जनरल स्टोअर्स) तारकपूर मोबा. ९२७१३८१०१०, पियुष जग्गी मोबा.८१४९०७८१४९, किशोर कंत्रोड  तारकपूर मोबा.९२२६७८३१०१येथे संपर्क साधावा.         
          मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंजाबी सेवा समिती (ट्रस्ट) चे पदाधिकारी सुनिल सहानी, सुनिल आनंद, बबला दुग्गल, केवल सबलोक, पिंकी माकर, डॉ. सुरेंद्र खन्ना, चेतन जग्गी, प्रमोद चड्डा, चरण तलवार, विनोद दिवाण, राजू बस्सी, पियुष जग्गी व किशोर कंत्रोड आदि परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments