अमोल भांबरकर यांना राज्यस्तरीय ''महाराष्ट्र समाजरत्न'' पुरस्कार प्रदान


अमोल भांबरकर यांना राज्यस्तरीय ''महाराष्ट्र समाजरत्न'' पुरस्कार 

वेब टीम नगर,दि. ३ -पुणे येथील युनिटी हॉस्पिटल,औन्ध येथे शांतिदूत परिवारातर्फे प्रेस फोटोग्राफर तथा विश्वहिंदु परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर यांना राज्यस्तरीय ''महाराष्ट्र समाजरत्न'' पुरस्कार विठ्ठल जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक(से.नि.)यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी श्याम देशपांडे (आय.ए.एस),व्यंकटरावजी गायकवाड अति.मुख्य.सचिव जलसंधारण(से.नि),प्राचार्य कैलास बवले,शांतिदूत परिवार अध्यक्ष सौ.विद्याताई जाधव.युनिटी हॉस्पिटलचे डॉ.अमित काळे,डॉ.प्रीती काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला.    अमोल भांबरकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक भान जपत सामाजिक सेवेसाठी समाजात नवं चैतन्य निर्माण केले.तसेच भारतीय संस्कृतीचा उज्वल वारसा जतन करणारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शांतिदूत परिवारातर्फे अमोल भांबरकर यांना राज्यस्तरीय ''महाराष्ट्र समाजरत्न'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदुपरिषद मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे,पत्रकार राजेश सटाणकर,स्वराज्य टेक्निकलचे शाखाधिकारी सुरेंद्र सोनवणे,सागर पांढरे आदी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments