चिंचवड मध्ये निकामी बॉम्ब सापडल्याने खळबळ

चिंचवड मध्ये निकामी बॉम्ब सापडले 

ब्रिटीशकालीन बॉम्ब असल्याचे निष्पन्न 

वेब टीम पिंपरी,दि. २ - चिंचवड गावातील चाफेकर चौकात असलेल्या भंगार विक्रेत्याच्या दुकानाजवळ  बॉम्बसारख्या दिसणार्‍या चार वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तपासणीअंती हे चारही ब्रिटिशकालीन बॉम्ब असून ते निकामी करण्यात आले असल्याचे सिद्ध झाल्याने चिंचवडमधील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावात वेताळवस्ती येथे साफसफाईचे काम करणार्‍या एका महिलेला अडगळीत बॉम्बच्या आकाराच्या चार वस्तू दिसल्या. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने पाहणी करून या चारही वस्तू ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे उघड झाले.
ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असून त्यापासून कोणताही धोका नसला तरी हे बॉम्ब लोकवस्तीमध्ये कसे आले. भंगारमध्ये कुणी त्याची विक्री केली आहे का, अशा विविध मार्गाने चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हे ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. माहिती मिळताच या परिसरात बॉम्ब बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. चिंचवड पोलिसांनी चारही ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments