श्रीमंत बालाजी गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक ,सामाजिक उपक्रम

श्रीमंत बालाजी गणेश मंदिराच्या  वर्धापनदिनानिमित्त
विविध धार्मिक ,सामाजिक उपक्रम

  वेब टीम नगर,दि. १ - श्रीमंत बालाजी गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त पंचरंग युवक मंडळ (ट्रस्ट) च्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी  पंचरंग गल्ली, जुने विठ्ठल मंदिराजवळ, तोफखाना अ.नगर येथे मंगळवार दि. ३ मार्च ते गुरुवार दि. ५ मार्च पर्यंत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोगा यांनी दिली.
     या वर्धापनदिनानिमित्त मंडळाच्यावतीने मंगळवार दि.३ मार्च रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत अनुलोम सामाजिक संस्थेच्या सहकार्याने   प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत मोफत गोल्ड कार्ड वाटप शिबीर तसेच हिंदू धर्माचे प्रतिक तुलसी रोप वाटप कार्यक्रम,  बुधवार दि.४ मार्च रोजी सकाळी १० ते दु.३ पर्यंत रक्तदान शिबीर, संध्याकाळी ८ वा. श्रीराम भक्त मंडळ हनुमान चालीसाचा  कार्यक्रम, गुरुवार दि.५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता गणेश पुजन, सकाळी७ वाजता अभिषेक पुजा, सकाळी ९ वाजता . पुण्याहवाचन, मातृकापुजन, नक्षत्रपुजन, नवग्रहपुजन, होवन, दुपारी १ वाजता महाप्रसाद व उत्कर्ष बालगृह येथील अनाथ व गरजू मुलांना अन्न धान्य वाटप असे विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम होणार आहे.
     यासर्व धार्मिक व सामजिक कार्यक्रमाचा नगरवासींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आनंद गोंधळे, उपाध्यक्ष नरेश कोडम यांनी केले आहे. हा वर्धापन उत्सव यशस्वी करण्यासाठी पंचरंग युवक मंडळाच्या सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments