कार्याचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच


 कार्याचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच 

अनिल इवळे - कार्यकर्ता हाच संघटनेचा कणा असतो

 वेब टीम  नगर,दि. १ - संघटना हि सर्व संघटित झाल्याशिवाय होउच शकत नाही. संघटनेचे ध्येय, धोरणे, उद्दीष्टे याची जाण कार्यकर्त्यांना पाहिजे ती असली म्हणजे संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव निर्माण होतो. कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता हा त्या संघटनेचा कणा असतो. कार्य करणार्‍या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करणे सर्वाचे कर्तव्यच असते, असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे नगर शहर अध्यक्ष अनिल इवळे यांनी केले.
     या महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या सत्कार्याची दखल घेऊन प्रांतअध्यक्ष कल्याणराव दळे यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रांत उपाध्यक्षपदी त्यांची निवड केल्याबद्दल ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या नगर शहर तालुका, अध्यक्ष-उपाध्यक्ष, पदाधिकार्‍यांच्या हस्ते गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनिल इवळे बोलत होते.
     या सन्मान सोहळ्यास सोमनाथ कदम, संदिप घुले, रमेश बिडवे, प्रमोद गुरव, सुमित बटुळे, शाम औटी, नितीन आंधळे, मनोज खोंडे, अमोल घोडके, प्रशांत वाघचौरे, वनिता बिडवे, मनिषा गुरव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इवळे पुढे म्हणाले माऊली मामांनी प्रत्येक कार्यकर्त्यांला संघटनेत घेवुन, पदे देवुन, संघटना कशी वाढवावी, प्रत्येकाचा आदर-सन्मान करुन केवळ पदाची लालसा न धरता कार्यकर्त्यांच्या ठायी अहंभाव न ठेवता समाजात घडणार्‍या लहान-मोठ्या घटनांची नोंद घ्यावी आत्मविश्‍वास बाळगून परिश्रम, चिकाटी आणि सातत्य ठेवावे श्रेय लाटण्यासाठी मनोवृत्ती नसावी, संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य, व पैसा हे पंचदान दिले कि संघटनेला जगात तोड नसते हे आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या मनावर बिंबवले यामुळेच आम्ही आमचा महासंघ जिल्ह्यातील गावागावात पोहचवून कार्याला दिशा दिली, असे सांगितले.
     सत्काराला उत्तर देताना माऊली गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कि, हि निवड माझी नसून आपल्या सारख्या  महासंघासाठी अहोरात्र झटणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे. वर जरी हे पद मिळले तरी मी त्या पदाला मान सन्मान देउनच जिल्ह्यात अजुनही भरीव असे काम करीन यासाठी तुमच्या सर्वांची साथ, प्रेम असेच राहील असा विश्‍वास व्यक्त केला.
     यावेळी दादासाहेब आगळे, राजेंद्र चुंबळकर, मल्हारी गिते, बाळासाहेब इवळे, अनिल सकट, सुनिल क्षिरसागर, साईनाथ ससाणे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments