एन.एस.एस विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गांधी विचार शिबीरात सहभाग

एन.एस.एस विद्यार्थ्यांचा
गांधी विचार शिबीरात सहभाग

   वेब टीम  नगर दि.८  - अहमदनगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जेईएस कॉलेज, जालना आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय गाधी विचार अभ्यास शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरातील श्रमदानाअंतर्गत कॉलेज परिसरात स्वच्छता केली. व सांस्कृतिक कार्यक्रमात, राष्ट्रीय एकता, गांधी विचार, शिक्षणाची महत्व  इ. विषयावर पथनाट्य सादर केली गेली. गांधी विचारांच्या संबंधी सामाजिक न्याय, मूल्यांचे महत्व, शेतकरी आत्महत्या, स्त्री-पुरूष सहजीवन, आजचा युवक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच ग्रामीण भारताचा विकास इ.विषयावर व्याख्याने झाली. यात महाविद्यालयातील एन.एस.एस.चे स्वयंसेवक आदित्य कोळी, सागर गाडे, वैष्णवी पाडे यांचा सहभाग होता.
     शिबिरात गु्रप नेतत्व करत शिबिर यशस्वीतेसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांनी प्रमाणपत्र देवून सत्कार केला. अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे,उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गायकर, उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्टार ए.वाय.बळीद, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक घोरपडे व डॉ.मालती येवला यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments