नागरीकांना नाहक मनस्ताप एस.पी.नी लक्ष घालावे


वहिवाटीचा रस्ता अडवून अतिक्रमण करून नागरीकांना
 नाहक मनस्ताप एस.पी.नी लक्ष घालावे - मागणी

वेब टीम  नगर,दि.८  - सर्जेपुरा रामवाडीत शेडचे बांधकाम करुन नाग  रिकांचा वहिवाटीचारस्ता अडविला. त्याला विरोध केल्याचा राग धरुन माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्यासह ९जणांवर खोटा गुन्हा दाखल केल्याने झोपडपट्टीतीलनागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी शंभर-सव्वाशे नागरिकांनी पायपीट करत एस.पी.कार्यालयात हजर झाल्या. रामवाडी झोपडपट्टीतील नागरिकांच्या हितासाठी उडाणशिवे कार्यरत असल्याने  नागरिकांनी विशेषत: महिलांनी एस.पी ना निवेदन दिले. खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कार्यालय परिसरात झालेली गर्दी पाहता त्याला आंदोलनाचे स्वरुप आले होते. रामवाडीत ते एस.पी.कार्यालयापर्यंत नागरिकांची पायपीट हा अप्रत्यक्ष मोर्चाच ठरला. यामागे नागरिकांचा मनस्ताप व्यक्त झाला.उडाणशिवे आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याने रामवाडीकर संघटीत झाले आहे. या प्रकरणी एस.पी.नी लक्ष घालून यातील सत्य उजेडात आणावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
     निवेदनावर भगवान जगताप, गणेश मसने, सलमान शेख, कमलाबाईभिंगारदिवे आदि ७९ जणांच्या सह्या आहेत. निवेदनासोबत संबंधित अतिक्रमणप्रकरणाचे मनपाला दिलेल्या निवेदनाची व याच कारणावरुन नागरिकांनाधमकावल्या प्रकरणी दखल तक्रारी अर्जाची प्रती जोडण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments