नागरदेवळे येथे सोमवारी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

नागरदेवळे येथे सोमवारी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

वेब टीम नगर,दि. ८ -  नागरदेवळे येथे सोमवार दि.१० रोजी फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळ येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी ९ ते३ या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
     सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांना पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची पुणे येथे जाणे, येणे, राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेलीआहे.
     तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी  जालिंदर बोरुडे मो.नं. ९८८१८१०३३३यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments