‘रांजणगाव श्री २०२०’ शरीर सौष्ठव स्पर्धा दि.१६ रोजी

‘रांजणगाव श्री २०२०’ शरीर सौष्ठव स्पर्धा दि .१६ रोजी

 वेब टीम नगर,दि. ६ -  इंडियन बॉडी बिल्डर्स असोशिएशन मान्यता प्राप्त क्रिडा मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोशिएशन यांच्या मार्गदशनाखाली अहमदनगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने, रांजणगाव मशिद  श्री या स्पर्धेचे आयोजन समस्त युवा मंचाचे प्रकाश गाढवे, परशराम तागड, सजिद मन्यार, सोमनाथ पवार, सिद्धांत जवक, राहुल पठारे व समस्त रांजणगाव मशिद ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व श्री.सुरेंद्र बोराडे, संयोजक सचिव यांच्या पुढाकारे रविवार दि. १६  फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६  वाजता श्री.शिवाजी विद्यालय रांजणगाव मशिद, वाळवणे रोड   सुपा, ता.पारनेर,  येथे  भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
     या स्पर्धेतही स्पर्धाकांवर रोख बक्षिसे तसेच सुर्या न्युट्रीशिएनचे अजित पवार यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर तसेच इंडोहंक स्पोर्टस् अॅीण्ड न्युट्रीशिएनचे महेश भुजबळ यांच्याकडून आकर्षक असे सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसे पुढील प्रमाणे - एकूण सहा वजनी गट , प्रत्येक वजनी गटात अनुक्रमे पाच बक्षिसे प्रथम- ३०००  सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, द्वितीय - २५०० सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, तृतीय - २ ००० सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, चतुर्थ -१५००  सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, पंचम - १०००  सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, किताब विजेता- ११००० सन्मान पत्र, सन्मान चिन्ह आणि मानाचा श्री, उपविजेता - ७००० सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, बेस्ट पोझर -५००० सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अ.नगर चे शरीर सौष्ठव  संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भिंगारदिवे, संस्थापक मधुकर गायकवाड, सचिव मनोज गायकवाड, मयुर दरंदले, कैलास रणसिंग, सतिष रासकर, हनिफ शेख, सुरेंद्र बोराडे, अजित गायकवाड, शब्बीर अन्सार सय्यद, कैन्हय्या गिलशेर, डेव्हिड मकासरे, राहुल कुलकर्णी, प्रतिक पाटील, अनिल जाधव, सुरज पर्वत, ओंकार कुंभकर्ण, तुषार पारधे, महेश भुजबळ आदींसह संघटनेचे पदाधिकारी व रांजणगाव मशिद ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments