स्नेहबंधच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वेब टीम नगर,दि. ६ - शहरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ख्यातनाम असलेल्या डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे संस्थेच्या स्थापनेस या वर्षी ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेद्वारा अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात. प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या प्रेरणेने अहमदनगर कॉलेज, मध्ये सुरु झालेला स्नेहबंध हा देखील यापैकीच एक उपक्रम आहे. याच संस्थेचा एक महत्वाचा भाग असलेल्या आय. एम. एस. संस्थेच्या वतीने अहमदनगर कॉलेज मधील सामाजिक उपक्रम करणार्याच स्नेहबंध या उपक्रमास १०० स्कूल बॅग, कंपास, पेन, पेन्सील,वही ई. शैक्षणिक साहीत्यचे नुकतीच आय. एम. एस. संस्थेत आयोजित कार्यक्रमास हस्तांतर केले. आय एम एस संस्थेच्या मुख्य ग्रंथपाल डॉ.स्वाती बार्नबस व संस्थेचे संचालक डॉ.एम.बी.मेहता यांच्या प्रेरणेने संस्थेने वरील शैक्षणिक साहीत्य स्नेहबंध उपक्रमास हस्तांतरित केले.आय एम एस संस्थेच्या मुख्य ग्रंथपाल डॉ.स्वाती बार्नबस याही नेहमीच गरजूंना मदत करत असतात. त्यांनी स्नेहबंध उपक्रमाच्या साह्याने ग्रामीण भागातील हुशार व गरजू विध्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. स्नेहबंधच्या स्वयंसेवकानी या उपक्रमासाठी नगर तालुक्यातील १० गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांच्या मदतीने १०० गरजू विद्यार्थ्याची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. स्नेहबंधचे समन्वयक डॉ. शरद बोरुडे, य.च.म.मु.विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. जी. एस. गायकवाड, स्नेहबंधचे स्वयंसेवक महेश सोनवणे, अभिजीत आढाव,योगेश हांडे, किशोर सावंत, आदित्य कोळी, प्रगती केसभट, सायली बेरड, मयुरी सुपेकर, मुस्कान शेख, प्रियंका शिंदे , आरती आटोळे, प्रियंका मोहिते, किरण तापकिरे यांनी मागील काही दिवसात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमानवस्ती (मेहेकरी), निंबोडी, उक्कडगाव, नारायणडोह, दरेवाडी, सारोळा बद्धी, कोल्हेवाडी, टाकळी काझी, मदडगाव व सांडवे या १० गावात जाऊन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व विद्यार्थांना विविध शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. या दरम्यान प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्नेहबंध टीम चे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले. टाकळी काझी जिल्हा परिषद गटातील शाळेतील गरजू विध्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल मदडगाव येथील कार्यक्रमात केंद्रप्रमुख काळे यांनी आभार व्यक्त करून डॉ.स्वाती बार्नबस याच्या दातृत्वाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्याक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. आर. जे. बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments