''लक्ष्मी महात्म्य कथा'' गुरुवार पासून प्रारंभ

  ''लक्ष्मी महात्म्य कथा'' गुरुवार पासून प्रारंभ

 कथाकार वैष्णवाचार्य युगल शरणजी महाराज                               
वेब टीम नगर,दि. १२  -वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळाला २५ वर्ष पूर्ण झाल्याने ''लक्ष्मी महात्म्य कथा' या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी जगन्नाथ कथेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी पासून १७ फेब्रुवारी पर्यंत खाकीदास बाबा मठ लालटाकी येथे दुपारी ३ते ६ या वेळेत ''लक्ष्मी महात्म्य कथा'' श्री वैष्णवाचार्य युगल शरणजी महाराज यांच्या मधुर वाणीने कथा सादर  होणार आहे.''लक्ष्मी महात्म्य कथा'' नगर शहरात प्रथमच होत आहे.तरी या लक्ष्मी महात्म्य कथेचे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.                                                                                                                               १३ फेब्रुवारी रोजी लक्ष्मी प्रकटदिन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेआहे.१४ फेब्रुवारी रोजी श्री लक्षीमीनारायण विवाह,१५ फेब्रुवारी रोजी श्री गजलक्ष्मी दर्शन,१५ फेब्रुवारी रोजी श्री दीपोत्सव,१६ फेब्रुवारी रोजी श्री झुला दर्शन,१७ फेब्रुवारी रोजी होम हवन पूर्णाहुती व भांडारा चे आयोजन करण्यात आले आहे तरी या ''लक्ष्मी महात्म्य कथा''श्रवणाचा लाभ भाविकांनी घ्यावा.असे आवाहन वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.               

Post a Comment

0 Comments