आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित व्यसनमुक्ती शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित व्यसनमुक्ती शिबीर      
    वेब टीम  नगर,दि. १२  -  व्यसन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणे. व्यवहारात व्यसन हा शब्द एखाद्या वाईट सवयीबद्दल, तिच्या आहारी जाण्याबद्दल वापरला जातो. तंबाखू खाणे, गुटखा, मावा, सिगारेट वा विडी ओढणे, दारू पिणे इत्यादी चे सेवन गरज नसताना करणे - या बाबतीत जेव्हा स्वतःच्या इच्छेनुसार एखादा माणूस ही गोष्ट थांबवू शकत नाही, तेव्हा तो या बाबतीत व्यसनाधीन झाला आहे, असे समजतात.   अश्या अनेक प्रकारच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करीत असते परंतु त्यांना योग्य मार्ग व समुपदेशन मिळत नाही, यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग प्राण शिबिराच्या माध्यमातून कोणतेही औषध न देता प्राचीन काळापासून चालत आलेली योग साधना आणि जग प्रसिद्ध सुदर्शन क्रिया च्या माध्यमातून योग्य ज्ञान मार्गदर्शन करून त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करते. तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, दारू या व्यसनातून नैसर्गिकपणे सुटका करा, जीवन अनमोल आहे, प्राण शिबिर अटेंड करा आपला प्राण वाचवा.
      अहमदनगरच्या वतीने दि.१८ ते २३ फेब्रुवारी  दरम्यान सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत  ज्ञानक्षेत्र, गावडे मळा, अहमदनगर येथे व्सनमुक्ती शिबीर आयोजित करण्यात आली आहे. आपले जीवनाला योग्य मार्ग व चांगल्या मार्गाने जाण्यासाठी  या शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी लाभ घ्यावे, असे आवाहन आयोजक कृष्णा पेंडम यांनी केले.
     आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने व्यसनमुक्ती शिबीरे अनेक ठिाकणी आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सहभागी झालेल्या नागरीक शिबिर केल्यानंतर अनेक लोकांचा चांगला अनुभव आहे आणि  सुखी जीवन जगत आहेत.

Post a Comment

0 Comments