जागतिक महिला दिनानिमित्त सुगम गीत, वक्तृत्व स्पर्धाअहमदनगर महिला मंडळच्यावतीने

जागतिक महिला दिनानिमित्त सुगम गीत, वक्तृत्व स्पर्धा

 वेब टीम  नगर,दि. २९ - अहमदनगर महिला मंडळ, दिल्लीगेट, संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त यंदाच्या वर्षीही सुगम  गीत गायन व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सदर स्पर्धा दि. ११ व १२ मार्च रोजी दु. ३ ते५ या वेळेत अनुक्रमे सुगम गीत गायन व वक्तृत्व स्पर्धा  अहमदनगर महिला मंडळ, बालक मंदिर, दिल्लीगेट, नगर येथे होईल.
    या स्पर्धेत  वयवर्षे १८ च्यापुढे सर्व महिला सहभागी होऊ शकतात.  स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ३० आहे.
तरी, जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभागी व्हावं असं संस्थेच्या अध्यक्ष ज्योती केसकर आणि सेक्रेटरी प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमा देशपांडे आणि शिल्पा रसाळ यांच्याशी मो. ८७८८८२२५१४, ९८६००६७५७५ वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments