आपल्यासाठी जागणारा , रक्षण करणारा पोलिस लक्षात ठेवा आपल्यासाठी जागणारा , रक्षण करणारा पोलिस लक्षात ठेवा

सुभाष मुथा - जलील शेख यांचा सत्कार

    वेब टीम  नगर,दि. २९ - सीमेवर जवान आणि गावात पोलिस या दोघांमुळेच आज देश- समाज टिकून आहे. पोलिसांची भुमिका आपल्या जीवनात अतिशय महत्वाची असून, समाजाने पोलिसांप्रती सदैव कृतज्ञ असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले.
     राष्ट्रपतीचे गुणवत्ता सेवा पदक मिळाल्याबद्दल सहाय्यक फौजदार जलील उस्मानभाई शेख यांचा सराफ बाजारातीलमहादेव मंदिर प्रांगणात सराफ व्यापारी बंधूंच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष मुथा बोलत होते.
सहाय्यक  फौजदार जलील भैय्या शेख यांची आज पोलिस दलात ख्याती आहे. अनेक गुन्हेगार त्यांनी गजाआड केलेत. दरोड्यांच्या प्रकरणाचा तपास यशस्वीपणे केला आहे. कोठेवाडी सारख्या घटनेत त्यांनी बजावलेली कामगिरी जिल्ह्याने पाहिली आहे. १९८४ पासून ते पोलिस दलात आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अतिशय धाडसी व अभ्यासू म्हणून त्यांची पोलिस दलात ख्याती आहे.
     पुढे बोलतांना मुथा म्हणाले, जलिल शेख हे व्यापारी- सामान्य नागरिक सर्वांना  आधार वाटतात. त्यांचे वडिल  उस्मान शेख त्यांनाही राष्ट्रपतींचे पदक मिळाले होते. तोच वारसा जलीलभाईं पुढे चालवत आहे. त्यांच्यासारखे प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलिस हे नगरच्या पोलिस दलाचे भुषण असल्याचे सांगून त्यांचा आदर्श इतर पोलिसांनी घ्यावा, असे आवाहन आवाहन त्यांनी केले.
     पोलिस हाच आपला सच्चा मित्र आहे. एखादी चुक झाली की, आपण पोलिसांवर टिका करतो, प्रसंगी मोर्चे काढतो. सगळ्या पोलिस खात्यावर दोष देतो, जर चुकल्यावर टिका करतो तर चांगलं काम केल्यावर पाठीवर शाबासकीची थाप पण समाजाने मारली पाहिजे, असे ते म्हणाले.
     आपण पोलिसांच्या चुका लक्षात ठेवतो, सर्वांत जास्त टिका पोलिस सहन करतात, पण जशा चुका लक्षात ठेवता तसाच पोलिसांचा त्यागही लक्षात ठेवला पाहिजे. पोलिस जनतेचे शत्रू नसून मित्र आहेत. पोलिसांना दिवाळी नाही, गणपती, नवरात्र आपण साजरे करतो पोलिस बंदोबस्तात मग्न  असतात. आपला आनंद, कायदा सुव्यवस्थेसाठी काम करतांना पोलिसांना आपले कुटूंब परिवार यांना वेळ देता येत नाही. चुकणारा नाही आपल्यासाठी रात्रभर जागणारा व आपले रक्षण करणारा पोलिस लक्षात ठेवा, असे मुथ्था म्हणाले.
     यावेळी व्यापारी सुरेश मुथा, बापू गांधी, दिलीप मुथा, श्रेणिक शहा, बबु पटवेकर, चंद्रकांत मिरांडे, गोपाळ वर्मा, श्रीकांत गायकवाड, जयशेठ मुथा, संजय शहा, रसिक कटारिया, शिवाजी मदडगांवकर, अरुण जंगम,  महादेव मंदिराचे पुजारी  तिवारी, शेखर गांधी, संतोष देडगांवकर, संजू शहा आदि उपस्थित होते.
सुभाष मुथा - जलील शेख यांचा सत्कार

   

Post a Comment

0 Comments