छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरणी श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द


छत्रपती शिवरायांचा अवमान प्रकरणी  छिंदमचे नगरसेवकपद रद्द 

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  सुनावणीत श्रीपाद छिंदम याचं पद रद्द करण्याचा निर्णय

वेब टीम मुंबई,दि. २८- छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली आहे.
तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली.
अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.
छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.

Post a Comment

0 Comments