सायली चव्हाण टॅलेंट सर्च परिक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आठवी
वेब टीम नगर,दि. २७ - हिंद सेवा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय स्टुडंट टॅलेंट सर्च या स्पर्धा परिक्षेत जि.प.प्राथमिक शाळा वायकरवस्ती ता.पाथर्डी येथील इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी सायली जतीन चव्हाण हिने २०० पैकी १७६ गुण मिळवून जिल्ह्यात आठवा व पाथर्डी तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला.तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेतही सायलीने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रयोगशील शाळा म्हणून नावलौकिक असलेली जि.प.प्राथमिक शाळा वायकरवस्ती ता.पाथर्डी येथे इयत्ता दुसरीत शिकणारी साईली बालवयातच चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजूषा,क्रिडा अशा अनेक गोष्टीत नैपूण्य प्राप्त करत आहे. साईलीच्या जडण-घडणीत मुख्याध्यापिका ज्योती आधाट, वर्गशिक्षक पोपटराव फुंदे, आई ज्योती व वडील जतीन चव्हाण यांचे तिला मोलाच मार्गदर्शन लाभत आहे
तिच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, सभापती सुनिताताई दौंड, उपसभापती मनिषाताई वायकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी अभिनंदन केले आहे. बालवयातच सायलीने विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाच सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments