काँग्रेस अल्पसंख्यांक   प्रदेश सरचिटणीसपदी फिरोज शफी खान


 
    वेब टीम  नगर,दि. २६- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीसपदी फिरोज शफी खान यांची नियुक्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वक्फ बार्ड अध्यक्ष माजी आमदार एम.एम.शेख यांनी केली. फिरोज खान गेल्या सहा वर्षांपासून या विभागाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करुन त्यांना बढती दिली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद, प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कमिटीत कार्यरत व्हावे, असा आदेशही नियुक्ती करतांना देण्यात आला आहे.
     या नियुक्तीबद्दल  राज्याचे महसूलमंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील व विनायक देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंके, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, कॅन्टोंमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रेसिडेंट अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप सकट, भिंगार महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर, युवा नेते अज्जूभाई शेख, आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments