आरक्षण परिपूर्ण लागू करावे

आरक्षण परिपूर्ण लागू करावे : मागणीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

वेब टीम नगर,दि. २६- एससी, एसटी, एनटी आणि ओबीसींचे आरक्षण परिपूर्ण लागू करावे या व अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन विभागाचे जिल्हाध्यक्ष माजी जि.प.सदस्य राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे नगर शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सदस्या शिल्पा दुसुंगे, प्रदेश समन्वयक शिवाजीराव जगताप, बंटी यादव, विभागाचे श्रीरामपूर अध्यक्ष सुभाष तोरणे, शेवगांवचे कचरु मगर, राहत्याचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बिडवे, कोपरगांवचे संतोष पगारे, नगर शहराध्यक्ष नाथ आल्हाट, नामदेव चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, उपाध्यक्ष मनोज धिडवे, शहर उपाध्यक्ष गौतम सूर्यवंशी, राहाता तालुकाध्यक्ष बाळासाहेब पगारे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पै.प्रदीप, विठ्ठलराव थोरात, बापूसाहेब मगरे आदि प्रमुखांनी भाग घेतला.
     निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदना भाजप प्रणित केंद्र सरकार अनुसूचित जाती, जमाती तसेच ओबीसी यांचे आरक्षण गोठविण्याचे  काम करत आहे. शासकीय सेवेतील बढती प्रक्रियेत जाणून-बुजून वंचित घटकांवर अन्याय केला जात आहे. एससी, एसटी, एनटी व ओबीसी यांना दिलेले आरक्षण परिपूर्ण लागू करावे. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. आर्थिकदृष्ट्या दृर्बल घटकांप्रमाणे कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी सदरील घटकांना त्यांच्या टक्केवारीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे. आदि विविध मागण्या करण्यात आल्या.
     पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज शफी खान, पक्षाचे शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ.सविता मोरे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, भिंगार महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, राजेश बाठिया आदिंनी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला. तत्पूर्वी आंदोलकांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. यावेळी आरक्षण संदर्भात भाजपप्रणित केंद्र सरकार आरक्षण संपुष्टात आणण्याचे निर्णयाकडे जात आहे, असा आरोप अनु.जाती-जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.समाज कल्याण समितीचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे यांनी केला. यावेळी केंद्र सरकारच्या निर्णयाचा बैठकीत निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष नाथ आल्हाट यांनी प्रथम प्रास्तविक केले. यावेळी प्रदेश समन्वयक बंटी यादव, शिवाजी जगताप, नगरचे बाळासाहेब भुजबळ आदिंनी समयोचित भाषणे झाली.

Post a Comment

0 Comments