अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

कर्नाटक पोलिसांसह 'रॉ' चे अधिकारीही सेनेगलमध्ये आहेत.

वेब टीम मुंबई,दि. २३-

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळया गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. बॉलिवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना खंडणीसाठी त्याने धमकावले होते. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे.
गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अधिकारीही तिथे आहेत. इकोनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजारीने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. भारतात परतायचे नसल्याने रवी पुजारीने कायदेशीर पर्याय अवलंबला होता.
रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह २०० गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे त्याच्यावर आरोप आहे. सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता.

Post a Comment

0 Comments