अहमदनगर कॉलेजचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेल्या एनसीसी कॅडेटचा सत्कार


अहमदनगर कॉलेजचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व

 केलेल्या एनसीसी कॅडेटचा सत्कार


    वेब टीम  नगर,दि. २२ - १ ते २८ जानेवारी या दरम्यान पारपडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एन.सी.सी.रिपब्लिक डे कॅम्प  साठी अहमदनगर कॉलेजच्या ज्युनिअर अंडर ऑफिसर मोनिका जाधव व कॅडेट युगांशी गवळी या दोन कॅडेटची निवड झाली होती. महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. आर.जे. बार्नबस यांनी कॅडेटचे  अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
     याप्रसंगी बोलताना प्राचार्य म्हणाले की, संधी, निरंतर सराव, कठीण परिश्रम, जिद्द, उत्साह ,चिकाटी, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे मिळालेल्या यशाबद्दल आणि महाविद्यालयाचे दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केल्या बद्दल तुम्हा दोघींचा महाविद्यालयास सार्थ अभिमान आहे.
     या कॅम्पसाठी संपूर्ण भारतातून २१५५ एनसीसी कॅडेटची निवड झाली होती त्यामध्ये७१० मुली होत्या. बटालियन स्तरापासून ते इंटरग्रुप, राज्यस्तरीय आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर निवड केली जाते. निवड झालेल्या कॅडेटला अतिशय कठीण प्रशिक्षणास सामोरे जावे लागते. या कॅम्प दरम्यान १७ डिरेक्टरेट विविध स्पर्धा होतात. यावेळी महारष्ट्र डिरेक्टरेट उपविजेते ठरले आहे या उपविजेत्या डिरेक्टरेट या दोघी सदस्य होत्या. विशेष अभिमानाची बाब म्हणजे ज्युनिअर अंडर ऑफिसर मोनिका हिची प्रतिष्टीत प्रधान मंत्री रॅली साठीच्या टेबल ड्रिल साठी निवड झाली होती तर कॅडेट युगांशी गवळी हिची समूह नृत्य, बैले नृत्य, पंतप्रधानासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. 
     एन.सी.सी. विभागाचे लेफ्टनंट .एम.एस.जाधव, उपप्राचार्य डॉ. अरविंद नागवडे ,डॉ.बी.एम.गायकर, डॉ.सय्यद रझाक ,रजिस्ट्रार ए.वाय.बळीद व सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांनी कॅडेटंचे अभिनंदन केले. १७ महाराष्ट्र बटालियनचे सी.ओ.कर्नल झेंडे व इतर कर्मचार्‍यांनीही कॅडेटचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments