विजय भालसिंग यांना रयत भूषण पुरस्कार प्रदान

विजय भालसिंग यांना रयत भूषण पुरस्कार प्रदान                                                                                       

वेब टीम  नगर,दि. २० -छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र                             
,भारत सरकार व रयत प्रतिष्ठान (जेऊर बा.)अ.नगर,यांच्या सहयोगाने राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा मंच,नवीदिल्ली (अ.नगर युनिट)आदींच्या संयुक्त विद्यमाने मानाचा रयत भूषण पुरस्कार नगर तालुक्यातील वाळकी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पदमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगीअशोक सोनवणे(संपादक लोकमन्थन),डॉ.अमोल बागुल, ॲड. मेहेरनाथ कलचुरी (संचालक अवतार मेहेरबाबा ट्रस्ट),लावणी संम्राज्ञी रोहिणी थोरात,ॲड. भानुदास होले,ॲड. महेश शिंदे, प्रा.सीताराम जाधव,पोपटराव बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. विजय भालसिंग यांनी एस टी बँकेची नोकरी करीत असताना सामाजिक भान ठेऊन समाजासाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले.तसेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.यापूर्वी भालसिंग यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  पुरस्काराबद्दल विजय भालसिंग यांचे वाळकी परिसर व पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन होत आहे.   

Post a Comment

0 Comments