भारत भूषण शास्त्रज्ञ डॉ.मेघनाद साहा यांची पुण्यतिथी


भारत भूषण शास्त्रज्ञ डॉ.मेघनाद साहा यांची पुण्यतिथी 

वेब  टीम    नगर,दि. १९- भारताचे थोर शास्त्रज्ञ भारत भूषण डॉ.मेघनाद साहा यांची६४ वी पुण्यतिथीनिमित्त  येथील तेली समाज पंच हॉल येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाल अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे व शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख गौतम कराळे पा., हरिभाऊ डोळसे, सोमनाथ देवकर, संतोष चोपडा, पत्रकार राजेश सटाणकर, भाऊसाहेब कर्पे, दिलीप साळूंके, सागर लोखंडे, परसराम सैंदर, राजू ढवळे, माधवराव ढवळे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.
     अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून डॉ.साहा पुढे शास्त्रज्ञ झाले. भारताची पहिली फाळणी१९०५ साली प्रथम झाली त्याचे ते साक्षीदार होते. या घटनेने त्यांनी स्वातंत्र्य लढयातही सहभाग घेतला होता. पुढे शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना ‘भारत भूषण’ हा किताब सरकारने दिला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
स्वागत हरिभाऊ डोळसे यांनी केले तर सोमनाथ देवकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments