मुख्यमंत्र्यांनी केली विनंती; शिर्डी बंद मागे


वेब टीम : शिर्डी
रविवारपासून पुकारण्यात आलेला ‘बेमुदत शिर्डी बंद’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर मागे घेण्यात आला आहे. हा ‘बंद’ मागे घेण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून हा ‘बंद’ मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय आज रात्री शिर्डी येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.

शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून आजपासून ‘बेमुदत शिर्डी बंद’ पुकारण्यात आला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सोमवारी २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलविली असून, तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे कैलास कोते यांनी माध्यमांना सांगितले.

Post a Comment

0 Comments