गाव तेथे युवक काँग्रेसची उभारणी करणार – हरपालसिंह चुडासमा


वेब टीम : अहमदनगर
गाव तेथे काँग्रेस करून काँग्रेस युवक आघाडी ही गावापासून शहरापर्यंत पोहोचवली पाहिजे व सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे व सत्यजित तांबे युवक प्रदेश अध्यक्ष लाभले असल्याने काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचले जाणार आहे व युवकांना काँग्रेसमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. लवकरच नगर शहराला जिल्हा अध्यक्ष निवड करण्यात येणार असल्याचे प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हरपलसिंह चुडासमा सांगितले.

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने पक्ष कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे प्रमुख पाहुणे हरपालसिंह चुडासमा समवेत सत्यजीत तांबे, अहमदनगरचे यु. काँ.चे प्रभारी अकील पटेल, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नगर शहराध्यक्ष मयुर पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, स्मितल वाबळे, राजू बोरुडे, तुषार पोटे, ऋषिकेश मुळे, अनिल धाडगे, मंगल भुजबळ, कुलदीप उमाप, नितीन खंडागळे, शरद पवार, संदीप दरंदले, अड अक्षय कुलट, मोहसीन शेख, मुबिन शेख, अनवर सय्यद आदींसह युवक पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसच्या माध्यमाने शहरांमध्ये रोजगार मेळावे युवकांसाठी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सूत्रसंचालन मयूर पाटोळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments