शाबास मिथू’चं पाहिलं पोस्टर रिलिज






शाबास मिथू’चं पाहिलं पोस्टर रिलिज
वेब टीम नगर,३१- बॉलिवूडमध्ये आली बॉलिवूडमध्ये बायोपिकपटांची लाटबॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सायना’, ‘सरदार उधम सिंग’, ‘मिसाईल मॅन’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या बायोपिकपटाची भर पडली आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित आहे.त्यात गेम चेंजर क्रिकेटपटूच्या भूमिकेत तापसी पन्नू ही धडाकेबाज मितालीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘शाबाश मिथू’ असे आहे.  तिने या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये तापसी हुबेहूब मितालीच्या गेटअपमध्ये दिसत आहे.“मला नेहमी विचारले जाते तुझा आवडता पुरुष क्रिकेट खेळाडू कोणता आहे. परंतु असा प्रश्न विचारणाऱ्यांनी माझी आवडती महिला क्रिकेटर कोण असा प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा आहे. मिताली राज माझी आवडती क्रिकेट खेळाडू आहे. ती एक अल्टीमेट गेम चेंजर आहे.” अशा आशयाची कॉमेंट तापसीने ‘शाबाश मिथू’च्या पोस्टरवर लिहिली आहे.

Post a Comment

0 Comments