वधू-वर मेळाव्याचे आयोजन

शिंपी समाजाचा वधू-वर मेळाव्याचे आयोजन 
वेब टिम नगर,दि . २९ - श्रीरामपूर येथील नामदेव शिंपी समाजाच्यावतीने रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालय सरस्वती कॉलनी वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे उदघाटन संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ह भ प ज्ञानेश्वर महाराज नामदास पंढरपूर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पुणे येथील माजी आमदार प्रकाश देवळे येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शामराव गणोरे भगुर  कांती भाऊ भंडागे पिंपळगाव बसवंत संजय काकडे कर्जत निवृत्ती हाबडे येवला संजय तूपसाखरे नाशिक बापूसाहेब वैद्य राहता शैलेश धोकटे नगर नामदेव भोसले श्रीरामपूर  अनिल बगाडे श्रीगोंदा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी समाजातील सर्व बंधू भगिनींना या मंगळवारी या मंगळ सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी मोबाईल या क्रमांकांवर संपर्क साधावा मेळावा यशस्वीतेसाठी श्रीरामपूर नामदेव शिंपी समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments