रसिक सावेडीकरांसाठी दिवाळी अंकांचा दीपोत्सव

 रसिक सावेडीकरांसाठी दिवाळी अंकांचा दीपोत्सव

अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेत दिवाळी अंकांचे स्वागत        

अहिल्यानगर - दिवाळीच्या स्वागताची सर्वत्र जल्लोषात तयारी सुरू असताना अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेमध्ये रसिक वाचकांसाठी दिवाळी अंकांचा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दिवाळी अंकांचे स्वागत व वाचकांना वितरण अहिल्यानगर जिल्हा वाचनाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ ,रसिक वाचक विजय महादर ,चंद्रशेखर देशमुख, विठ्ठल पाठक ,ग्रंथपाल अमोल इथापे,सहाय्यग्रंथपाल नितीन भारताल, सौ.सारिका देव यांच्या प्रमुख  उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
   
 प्राध्यापक शिरीष मोडक यांनी या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करताना सांगितले मराठी दिवाळी अंकांची शतकोत्तर परंपरा अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाने सातत्याने जपली आहे. सावेडी मध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू होत असताना त्यामध्ये रसिक वाचकांसाठी असंख्य दिवाळी अंकांची  उपलब्धता ही खर्‍या अर्थाने वाचकांच्या जीवनात दीपोत्सव साजरा करण्यासारखी आहे. रसिक वाचकांनी याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात विचारांचे दीप उजळवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 
      वाचक सदस्य चंद्रशेखर देशमुख यांनी या उपाक्रमाविषयी आनंद व्यक्त करताना वाचकांसाठी दिवाळी अंकांची ही रेलचेल खर्‍या अर्थाने विचारांचे दीप प्रज्वलित करणारी असल्याचे सांगितले. यावेळी विजय महादर ,विठ्ठल पाठक यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. 
सरस्वती पूजन करून रसिक वाचकांना दिवाळी अंकाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी सूत्रसंचालन शिल्पा रसाळ आभार अमोल इथापे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी साक्षी पद्म दिपाली कल्याणम यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments