जि .प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यावर केली कारवाई

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यावर केली कारवाई 

वेब टीम नगर : श्री. आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी खालील  ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना गंभीरशिक्षा केल्या आहेत. तसेच तीन ग्रामसेवक यांना सेवा निलंबित करण्यात आले आहे. 

1) श्री.आर.बी. काळे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत गायकवाड जळगाव,

ता.शेवगाव  यांना गैरवर्तनाबाबत बडतर्फ करणे.

2) श्री.र.गु.शेलार, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वडगाव तनपुरा, ता. कर्जत यांचे

गैरवर्तनाबाबत  सक्तिने सेवानिवृत्त 

3) श्री.ज्ञा.गो.सोनवणे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत मिरी, ता.पाथर्डी

गैरवर्तनाबाबत चार वेतनवाढी कायमस्वरुपी बंद.

4) श्री. आ.दा.आखाडे, तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत हळगाव, ता.जामखेड येथे कार्यरत

असतांना अनियमितता व गैरहजर प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरुपी बंद ही शिक्षा केलेली

आहे. 

5) श्री.शि.बु.सुपे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लोणी खु. ता.राहाता येथे

गैरवर्तन प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरुपी बंद.

6) श्री.आर.व्ही.बोर्डे, तत्कालिन ग्रामसेवक, ग्रामपंचायत बोधेगाव, ता.राहुरी गैरवर्तनाबाबत प्रकरणी

एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद.

7) श्री.ब.तु.शेटवाड, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत माळी चिंचोरा, ता.नेवासा यांचे

गैरवर्तनाबाबत एक वेतनवाढ तात्पुरती बंद

सेवानिलंबित

1) श्री.इम्रान शेख, ग्रामसेवक, ग्रामपंचायत खुरदैठण, ता. जामखेड पाक्षिक /मासिक सभांना

गैरहजर, विविध योजना राबविणेकामी दुर्लक्ष.

2) श्री.महादेव मल्हारी ढाकणे, तत्कालिन ग्रामसेवक, दिघी, ता. नेवासा- १४ वा वित्त आयोग

आर्थिक अनियमितता.

3) श्रीम.श.यु.पठाण, तत्कालिन ग्रामसेवक, ग्रामपंचायत काळेगाव, ता.शेवगाव गैरवर्तन व

संशयित अपहार  गटविकास अधिकारी पं.स.शेवगाव यांनी दि.२४/६/२०२२ रोजी गुन्हा दाखल

केलेला आहे.

Post a Comment

0 Comments