जवखेडा खालसा हत्याकांडातील तीन आरोपी निर्दोष
वेब टीम नगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी खून प्रकारणी अटक असलेल्या तिन्हीही आरोपींवर सरकार पक्ष आरोपींवर आरोप सिद्ध करू न शकल्याने तिन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारी (दि.३१) निर्दोष मुक्त केले.अशोक दिलीप जाधव, प्रशांत दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत. हा खटला तब्बल सात वर्षे न्यायालयात सुरु होता.
जवखेडे तिहेरी खून प्रकरण काय होते घटनेची माहिती
दि. 21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच दलित कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे खून करण्यात आला होता. मयत व्यक्ती पती-पत्नी व मुलगा होते.
याप्रकरणी मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
याप्रकरणात जाधव कुटुंबियांच्यावतीने दावा करण्यात आला होता की, हे तिहेरी खून प्रकारणी जवखेडे खालसा गावातील उच्चवर्णीय लोकांनी घडवून आणले. गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमाचे कलमे वाढविण्यात आली होती.
एकाच दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते. या प्रकरणात गृहमंत्रालयाने विशेष लक्ष घातले. पोलिस प्रशासनाने विशेष पथकामार्फत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र प्रवीण साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख लखमी गौतम व इतर अधिकारी तब्बल दीड महिने घटनास्थळ व पाथर्डी येथे तळ ठोकून होते. त्यानी या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.संशयित व काही स्थानिक नागरिकांचे नार्को व इतर मानसशास्त्रीय चाचण्या केल्यानंतर मयत जाधव कुटुंबीयांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून या गुन्ह्यात आरोपी प्रशांत दिलीप जाधव यास दि. 3 डिसेंबर 2014 रोजी, अशोक दिलीप जाधव यास दि. 7 डिसेंबर 2014 रोजी व आरोपी दिलीप जाधव यास दि. 18 डिसेंबर 2014 रोजी अटक करण्यात आली होती.
न्यायालयीन प्रक्रिया –
या प्रकरणातील दोषारोप पत्र म्हणजेच चार्जशीट तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शाशिराज पाटोळे यांनी न्यायालयात दाखल केले होते. आरोपपत्र दाखल केल्यानंतर खटल्यात महाराष्ट्र शासनाने मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. अहमदनगर सत्र न्यायालयाने दोन पुत्र आणि एक पिता अशा तिघांविरुद्ध डिसेंबर 2015 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण 54 साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीत मयत संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव आणि सुनील जाधव यांच्या मृतदेहाचे इंक्वेस्ट पंचनामे, घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे करण्यात आले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, घटनास्थळी मिळून आलेल्या बॅटरीचा पंचनामा, मयत संजय याच्या मोटरसायकलचा पंचनामा, घटनेच्यावेळी संजय आणि जयश्री यांना मारहाण करताना वापरलेली भरीव बांबूची काठी, मयत संजय याच्या चेहऱ्याचे भाग आणि पायाचे भाग लपवून ठेवण्यात आलेली बोरींगची केसिंग पाईप, मयताच्या कपड्याचे पंचनामे, घटनास्थळाची छायाचित्रे, घटनेच्यावेळी मयत संजय यांच्या शेतामध्ये बाजरीचे पीक असल्यास संबंधीचे दाखले, मयत जयश्री तिच्या अंगावरील कपडे आरोपींनी नाल्यामध्ये फेकून दिले होते त्या कपड्याचा पंचनामा, पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे आरोपी प्रशांत जाधव याने आपले वडील दिलीप जाधव यांच्या घरात बेडमध्ये लपवलेली हत्यारे, आरोपी प्रशांत याने गुन्ह्यानंतर जाधव यांच्या विहिरीत हत्यारे धुवून दाखवल्यासंबंधीचे प्रात्यक्षिक, आरोपी अशोक याने त्यानंतर त्याचे स्वतःचे आरोपी दिलीप तसेच मयत सुनील यांचे कपडे घराच्या मागील उकांड्यावर जाळले होते त्या संबंधीचा पंचनामा, आरोपी अशोक याने मयत जयश्री तिच्या अंगावरील साडी मिरी घोडेगाव ते पांढरीपुल रोडवरील असणाऱ्या नाल्यात टाकली होती, त्यासंबंधीचा पंचनामा, सदर साडी मयत जयश्री हिच्या आईने ओळख परेड दरम्यान दिलेली ओळखली होती ती ओळख परेड, आरोपी दिलीप जाधव याने दावीद दौलत जाधव यांच्या शेतामध्ये असलेले साधारण पंधरा वर्षे वापरात नसलेले बोरवेल दाखवणे संबंधीचा पंचनामा अशा विविध पंचनामातील पंच घटनेत वापरण्यात आलेल्या हत्यारासंबंधित डॉ. हर्षल ठुबे यांची साक्ष, घटनेच्या रात्री आरोपी प्रशांत यास पायाला झालेल्या जखमा संबंधी उपचार केलेल्या परिचारिकेची साक्ष, यातील आरोपींची मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आली होती. त्यासंबंधीचे निष्कर्ष या सर्व एकंदरीत पुराव्याचा विचार करता तिन्ही आरोपींना दोषी ठरविले जावे अशी आग्रहाची मागणी सरकार पक्षातर्फे ऍड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी केली होती.
दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सदरचे प्रकरण अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी दि 24 मे 2022 रोजी ठेवला आहे.
आरोपी अटकेत नसताना मानसशास्त्रीय चाचण्या
या प्रकरणाचे वेगळेपण असे की, यातील आरोपी अटकेत नसताना त्यांच्या संमतीने त्यांच्या नार्को, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर आदी मनोवैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. यासंबंधी सरकार पक्षातर्फे असे दर्शवण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या अनुषंगाने आरोपी अटकेत नसताना करण्यात आलेल्या मनोवैज्ञानिक चाचण्या पुराव्याचा भाग होऊ शकतो. या संदर्भाने तिनही आरोपींनी पुरावा कायदा कलम 27 या अनुषंगाने दिलेली माहिती व त्यातून निष्कर्ष आलेले निष्कर्ष व त्याप्रमाणे घडलेली घटना याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. हे ह्या खटल्याचे वैशिष्ठ होय. या तिहेरी खून प्रकारणी तपासाचे प्रमुख मानकरी
सदर गुन्ह्याच्या तपासात शेकडो अधिकारी व कर्मचारी व्यस्त होते. अनेक पथके नियुक्त करण्यात आली होती. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे, तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सहाय्यक फौजदार विष्णू घोडेचोर यांचे योगदान या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाचे होते.
0 Comments