घरात घुसून एकट्या असलेल्या महिलेचा विनयभंग

घरात घुसून एकट्या असलेल्या महिलेचा विनयभंग 

वेब टीम श्रीगोंदे : जमीनी बाबत भाऊबंदकीचा असलेला वाद विकोपाला जात यातून घरात एकटी असलेल्या विवाहितेस अश्लील शिवीगाळ,मारहाण,विनयभंग केल्या प्रकरणी महेश गोविंद महांडुळे,बापूराव दगडू भोस व एक आरोपी महीला (सर्व राहाणार रुईखेल,तालुका,श्रीगोंदा जि.अ.नगर)यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की,आरोपी महेश महांडुळे याने नुकतेच जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने ३.५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ACB ने रंगेहाथ पकडले होते. यामध्ये जामीनवर सुटून आलेल्या सदर इसमाने घरी आल्यावर पुन्हा हा किळसवाणा प्रकार केला आहे.महांडुळे परिवारात शेत जमीन वाटपावरुन भाऊबंदकीचे वाद सुरु आहेत.आमच्या वाट्याला आलेल्या जागेत कांद्याची वखार बांधू नये.! यासाठी फिर्यादी महिला व तिचे पती दि.२१मे 2022 रोजी दिर भानुदास महांडुळे व जाव कांचन भानुदास महांडुळे यांच्याकडे गेले होते.मात्र त्यांनी फिर्यादी महिलेला व त्यांच्या पतीला शिवीगाळ करुन, जीवे मारण्याची धमकी दिली.प्रकरण जास्त वाढू नये म्हणून.. ते तेथून निघून गेले.

यावेळी पती व मुले गावात जातो म्हणून, सांगून गेले होते.सकाळी रुईखेल (ता.श्रीगोंदा) येथे घरात एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून, महेश महांडुळे, बापूराव भोस व कांचन महांडुळे यांनी पती व मुलांची विचारपूस करुन दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यानंतर महेश महांडुळे व बापूराव भोस याने साडी व ब्लाऊज ओढून विनयभंग केल्याचे या फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे.नमूद महिलेच्या फिर्यादीवरुन सदर आरोपींवर भा.द.वि. ३२३, ३५४,४५२,५०४ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments