आज आमच्या शहराचा ५३२ वा वाढदिवस

आज आमच्या शहराचा ५३२ वा वाढदिवस  

२८ मे अहमदनगर शहराचा ५३२ वा स्थापना दिन म्हणजे काय? म्हणजे या शहराचा वाढदिवस ना! कोणाही सच्च्या नगरकराला  अभिमान वाटावा असाच दिवस.

अगदी सुरुवातीपासूनच या शहराची तुलना बगदाद,कैरो सारख्या त्या काळातील सुंदर शहरांशी केली जायची.  काळाच्या ओघात कसे कुणास ठाऊक पण आक्रमकांच्या हल्ल्यात हे शहर बकाल झालं खरं तर आजच्या ५३२ व्या वर्धापन दिवशी ते बकालपण घालवून या शहराची तुलना ईतर सुंदर शहरांशी कशी करता येईल याचा विचार प्रत्येक सच्च्या नगरकरांनी केला पाहिजे. 

खरे तर अनेक चांगल्या घटनांची सुरुवात ही नगर शहरापासून झाली अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर खापरी नळ योजनाही नगर शहराने इतर शहरांना पुरवलेली संकल्पना म्हटलं तर अगदीच वावगं ठरणार नाही.अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हटलं तर नगर-पुणे बस सेवा नगर शहरातून सुरू झाली. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.मात्र आज नगर शहराला सर्वात मोठे खेड असं काही नतद्रष्ट माणसे हिणवत राहतात.मान्य आहे, की आज शहरातला एकही रस्ता धड नाही.पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजलेले आहेत.मात्र आजच्या या दुरावस्थेला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर सहजा सहजी देता येणार नाही. 

 कधीकाळी या शहरात छानशी कारंजी होती.अलीकडच्या २०-२५ वर्षात लुप्त झालेल्या टांग्याच्या घोड्या साठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून शोभिवंत असे हौद ही होते.विरंगुळा स्थान म्हणून थोड्याच पण छानश्या बागा होत्या.म्हणजे त्या काळातील अन्य शहरांच्या तुलनेत असतील अशी बेंडकुळी भाग, मैसूरचे वृंदावन गार्डन ची तुलना होईल अशी महात्मा गांधी उद्यानातली कारंजी आणि त्यांची प्रकाशयोजना येथे अस्तित्वात होती. मुंबईतल्या तारापोरवाला एक्वेरियम अशी तुलना होईल असा बाळासाहेब देशपांडे उद्यानातील मासा होता. तर लाल टाकीवर काश्मीरच्या निषात बागेच्या धर्तीवरच गुलाबाचे उद्यान अशा कितीतरी गोष्टी कालौघात लुप्त झाल्या. मात्र नगरच्या कोटंबाग निजाम (भुईकोट किल्ला),चांदबिबीचा महाल, दमडी मशीद या शहराचे जन्माबरोबर उभा राहिलेल्या वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत.अर्थात काही वास्तूंकडे दुर्लक्षही झाले.त्यात फराहबक्ष,बेहस्तबाग मंझर-ए-सुभा कडे  दुर्लक्ष झाले ते खरं असलं तरीही त्या वास्तूंना काहीस पूर्वीच रूप देणं अवघड नाही, आवश्यकता आहे ती इच्छा शक्तीची.त्यासाठी पुरातत्त्व खात्याकडे सात्तत्याने पाठपुरावा करून भरगोस निधी आणण्याची गरज आहे.किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या रखडलेल्या कामालाही गती देण्याची गरज आहे हे काम निधीअभावी  अर्ध्यावरच रखडल्याने काहीसहा धर सोड वृत्तीचे प्रदर्शन यातून घडतं.वास्तविक पाहता हीच धरसोड वृत्ती या शहराचा विकास खुंटण्याला   कारणीभूत ठरत आहे. 

योजना तयार करणे त्यात वारंवार बदल करणे हेही या अधोगती मागचे मुख्य कारण आहे एखाद्या चांगल्या गोष्टींची निर्मिती करायची म्हटलं की अगोदर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या चांगल्या गोष्टी नष्ट करायच्या ही वृत्ती आता नगरकरांनी थांबवायला हवी. म्हणजे असं की आपण क्रीडा संकुल उभे केले पण त्या ठिकाणचे महात्मा गांधी उद्यान, तिथली शोभिवंत शोभिवंत,  कारंजी एवढेच काय क्रिकेटच्या मैदानात लगत असलेल्या कुस्तीसाठीच जवाहर नेहरू स्टेडियम अशा कितीतरी गोष्टी आपण गमवल्या.इतकच काय शहराच्या मध्यवस्तीत व्यापारी संकुल उभे करण्यासाठी त्या जागी उभे असलेले पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या धरतीच नेहरू मार्केट उध्वस्त करून टाकलं. आता व्यापारी संकुल कधी अस्तित्वात येणार कोणास ठाऊक?  असाच हलगर्जीपणा मुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे मुन्सिपल काउन्सिल हाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.  म्हणजे काय तर शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी जुन्या वैभवशाली वास्तू जमीनदोस्त केल्या गेल्या याला शहराच्या कारभारीन जितके जबाबदार आहे तितकेच ते कारभारी निवडून देणारी जनता ही जबाबदार आहे.

  म्हणूनच म्हटलं की शहराच्या 532 हव्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक सच्च्या नगरकरांनी संकल्प करायला हवा की शहराचे कारभारी निवडताना विकासाची दृष्टी असणारेच कारभारी निवडून देऊ जेणेकरून आशियातील सर्वात मोठे खेडे हे नगर शहराला लागलेले असून इतर चांगल्या शहरांची तुलना होईल असं शहर उभे करू याच शहराच्या वाढदिवसानिमित्त निमित्त शहराला शुभेच्छा... !

Post a Comment

0 Comments