अहमदनगर व्यापारी महासंघाची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात - ईश्वर बोरा

अहमदनगर व्यापारी महासंघाची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात : ईश्वर बोरा

सुनावणी न घेता अतिक्रमण विभाग व मनपाकडून प्रकरण निकाली काढण्याचा घाट

वेब टीम नगर : व्यापारी महासंघ द्वारे थेट पंतप्रधान कार्यालयात अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनधिकृतरित्या सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी धारक व पथारी वाले यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आलेली असताना देखील त्याबाबत कुठल्याही प्रकारची संधी न देता अगर सुनावणी ना घेता सदर प्रकरण थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवून प्रकरण निकाली काढण्याचा घाट अहमदनगर महानगरपालिके च्या नगर रचना व अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी आयुक्त साहेब यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे.

. याबाबत अहमदनगर व्यापारी महासंघ द्वारे तीव्र आक्षेप घेण्यात आले आहे. तसेच अहमदनगर महानगरपालिकेचे विरुद्ध विभागीय आयुक्त, नाशिक, महाराष्ट्र राज्य व माननीय उच्च न्यायालय येथे धाव घेण्याच्या मनस्थितीत अहमदनगर व्यापारी महासंघ असल्याबाबत अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निकाली काढलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शासन दरबारी सदर अनियमिततेबाबत मनपा विरूध्द दाद मागण्याचे ही नियोजन अहमदनगर व्यापारी महासंघ द्वारे अपील दाखल करून करण्यात येणार येणार आहे. दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कापड बाजारातील व्यापारी व हातगाडी धारक यांच्यात झालेल्या वादावरून त्रस्त झालेले शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार, गंज बाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली, राजे शहाजी भोसले रस्ता या गजबजलेल्या भागातील व्यापारी भयंकर रित्या सदर अतिक्रमण धारक हातगाडीवाले व पथारी वाले यांच्या जाचास वैतागलेले असून कोणत्या ही क्षणी पुन्हा रस्त्यावरून उतरून तिर्व स्वरूपाचे आंदोलन उभारण्याच्या व सनदशीर मार्गाने उपोषणास बसण्याचा निर्णय व्यापारी महासंघ ने केलेला असून त्याबाबत मा. आयुक्त यांना दिनांक २५ एप्रिल रोजी निवेदन देखील देण्यात आलेले आहे. 

त्यास देखील मनपा कडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्तर देत कार्यवाही सातत्याने करत असल्याबाबत सांगितले आहे व ह्याउप्रांत देखील व्यापारी महासंघाने आंदोलन पुकारल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी महासंघाची असेल असे शासकीय भाषेत दम व्यापारी महासंघास व पदाधिकारी यांना पत्राद्वारे देण्यात आले आहे.बाजारपेठेतील वर नमूद मुख्य भागात आजही सार्वजनिक रस्त्यांचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी वाले व पथारी वाले ह्यांचे द्वारे सातत्याने होत आहे. असे असून देखील मनपा कडून आंग झटकण्याचा व थातुरमातुर कार्यवाही ची दाखल देऊन कार्यवाही केल्याचा भास करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

अनेक वृत्तपत्रातून देखील आज ही सदर हातगाडी वाले व पथारी वाले ह्यांच्या गाड्या पुन्हा रस्त्यावर दिसायला लागल्या बाबत लेख प्रसिद्ध होऊन देखील त्याची कुठलीच तमा अगर दखल मनपा कडून घण्यात येत नसल्याबाबत व्यापारी व नागरिक ह्यांच्यात प्रचंड जनाक्रोष होत आहे. अहमदनगर व्यापारी महासंघ द्वारे पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालक मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अनेक शासन दरबारी यापूर्वीच धाव घेण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments