नेत्यांचे मौन प्रभाग रचना अन् आरक्षण सोडतीनंतर सुटणार...

नेत्यांचे मौन प्रभाग रचना अन् आरक्षण सोडतीनंतर सुटणार...

वेब टीम नगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीच्या तारखेअगोदर गट व गणाची रचना केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी इच्छुकांची भाऊगर्दी लक्षात घेता सध्या मौन पाळले आहे. 

आगामी निवडणुकीचे ध्येय डोळ्यामोर ठेऊन आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विकास कामांचे उरकून घेण्यावर सदस्यांनी भर दिला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम लवकरच बिगूल वाजणार आहे. अद्याप गट व गणाची रचना झालेली नाही. त्यानंतर गट व गणाचे आरक्षण सोडत होणार आहे. यात कोणाला कोणता गट.मिळेल याचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही.  काहींनी आतापासूनच डावपेच टाकण्यास सुरवात केलेली आहे. 

त्यातच आता नवीन गट व गण वाढणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. याचा परिणाम आता आपला गट व गण आरक्षीत झाला तरी काहीजण शेजारील गट व गणात जाऊन निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. 

ही सगळी सध्या चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यातील चर्चेला अद्याप कोणीच स्थान देण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधीही त्यावर गप्प बसून आहेत. गट व गणाची आरक्षण सोडत झाल्यावरच पुढील धोरणे ठरणार आहे. कोण कोणत्या गटात व कोणत्या पक्षाकडून लढणार यावर फक्त चर्चा सुरु आहेत. ऐन वेळी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments