बाळ बोठेची रवानगी नाशिक कारागृहात

बाळ बोठेची रवानगी नाशिक कारागृहात 


वेब टीम नगर :
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची रवानगी नाशिक येथील कारागृहात करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी इतरत्र हलविण्यात आले असून त्यात बोठेचा समावेश आहे, अशी माहिती उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

पारनेर येथील उपकारागृहाची क्षमता २४ कैद्यांची आहे. असे असले तरी जागेअभावी पारनेर उपकारागृहात ७० कैदी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या उपगृहात ४६ कैदी क्षमतेपक्षा जास्त आहेत. त्यापैकी नाशिक व औरंगाबाद येथील कारागृहात प्रत्येकी १० कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. अन्य ठिकाणी रवानगी कर

ण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बोठे याचा समावेश असून, त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. बोठे याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे जामिनासाठी बोठे याने अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बोठे याला पारनेर उपकारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून त्याला नाशिक कारारागृहात पाठविण्यात आले आहे. 


Post a Comment

0 Comments