राहुरी येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा

राहुरी येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा

तीन पीडित परप्रांतीय महिलांची सुटका एक महिला आरोपी ताब्यात

Dysp संदीप मिटके आणि PI दराडे यांच्या पथकाची कारवाई

वेब टीम राहुरी : आज दि. 09/05/2022 रोजी संदिप मिटके Dysp श्रीरामपूर यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.

त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi राजेंद्र आरोळे, HC औटी, HC जायभाये, लक्ष्मण बोडखे, PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ, पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.

Post a Comment

0 Comments