सलग 6 व्या दिवशी भारतात 2000 हून अधिक रुग्ण
चीनमध्ये विक्रमी संख्येत रुग्ण आढळले ; जर्मनी-फ्रान्समध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे
वेब टीम नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. सलग सहाव्या दिवशी भारतात 2000 हून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. चीनच्या शांघायमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 39 मृत्यू झाले आहेत, तर 21,058 संक्रमित देखील आढळले आहेत. त्याचवेळी, जर्मनी आणि फ्रान्समध्ये एका आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. आफ्रिका आणि अमेरिकेतही कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे.
भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,541 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2,541 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारतात कोविड-19 चे एकूण रुग्ण 4,30,60,086 वर पोहोचले आहेत. रविवारी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची संख्या 5,22,223 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणे 16,522 पर्यंत वाढली आहेत.
त्यामुळे कोरोना पूर्ण नाहीसा झालेला नाही तो अधून मधून डोके वर काढतच राहणार आहे. असेही मत तंज्ञानी व्यक्त केले आहे.
0 Comments