ट्रक दुचाकी अपघात दोघे जागीच ठार

ट्रक दुचाकी अपघात दोघे जागीच ठार  

 वेब टीम नगर : नगर-मनमाड रोडवरील पत्रकार चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकी वरील दोघे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उद्धव तेलोरे व बाळकृष्ण तेलोरे अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील मयत हे कोल्हार पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. नगरच्या दिशेने येणार्‍या मालट्रकने दुचाकीला पत्रकार चौकात धडक दिली.

दुचाकीवरील असलेल्या दोघांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना, शहर वाहतुक शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहतुक कोंडी झाली होती.अवजड वाहतूक गावातून होतेच कशी ,सीसी  काय दिखाव्या साठीच आहे का ? अशी  जमलेल्या गर्दीतून ऐकायला मिळत होती . 

दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments