जुन्या भांडणातून तरुणाचा खून

जुन्या भांडणातून तरुणाचा खून 

वेब टीम नगर : तरूणावर जुन्या भांडणाच्या वादातून चाकू हल्ला करणारा आरोपीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. शुभम विजय लोळगे (वय 25 रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याने स्वप्नील गोवींद दरोडे (रा. कायनेटीक चौक, अहमदनगर) यांच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकुने वार करून गंभीर दुखापत केली होती. स्वप्नील दरोडे यांच्या उजव्या कानावर, डोके आणि हातावर वार झाले होते.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पाठविले.

या पथकाने अवघ्या काही तासांमध्ये आरोपीचा शोध घेतला. आरोपी शुभम लोळगे यास अटक केली. त्याच्याकडून रक्त लागले कपडे हस्तगत करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments