हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वेब टीम पुणे : लॉजवर छापा मारून शहरात सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी  वेश्या व्यवसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीसह दोन अन्य तरुणींची सुटका केली आहे. 

सामाजिक सुरक्षा पथकाने  ताथवडे परिसरातील येथील लॉजवरही छापेमारी  केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल आणि हेमंत प्रणाबंधू साहू असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे साथीदार मुकेश, करण, युसूफ यांच्या मदतीने हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरोपी वेश्या व्यवसायासाठी तरुणींना विविध लॉजवर पाठवत होते. याठिकाणी तरुणीच्या नावावर बुकींग केलं जायचं. त्यानुसार ग्राहकांना पाठवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.

या प्रकरणाची सामाजिक सुरक्षा पथकाला गुप्त माहिती मिळाल्याने त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी एका अभिनेत्रीसह अन्य दोन तरुणींची सुटका केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणींच्या मदतीनेच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वेश्या व्यवसायाचे पैसे घेऊन जाण्यासाठी बोलावून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments