रशियन फौजांना रोखण्यासाठी पुलावर उभा राहिला अन्…

रशियन फौजांना रोखण्यासाठी पुलावर उभा राहिला अन्…

वेब टीम कीव : युक्रेनविरुद्ध रशियाची लष्करी मोहीम अद्यापही सुरू आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आणि सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचा आवाज आला. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या एका सैनिकाने रशियाच्या सैनिकांना थांबवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिलं.

युक्रेनमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रशियन रणगाड्यांना रोखण्यासाठी एका सैनिकाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शत्रूला रोखण्यासाठी बलिदान दिलं. या सैनिकाने रशियन लष्कराला युक्रेनमध्ये घुसण्यापासून रोखण्यासाठी एका महत्वाच्या पूलाच्या तोंडाशी उभं राहून स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं. यामुळे या ठिकाणी युक्रेनच्या मुख्य भूमिला जोडणारा रस्ताच रशियन रणगाड्यांसाठी बंद झाला.

या सैनिकाचे नाव व्हायटली स्काकुन व्हॉलोडीमायरोव्हिच आहे. तर व्हायटलीने खेरसन प्रदेशातील हेनिचेस्क पुलावर स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं. जनरल स्टाफच्या फेसबुक पेजच्या पोस्टनुसार, रशियाला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा पूल उडवणे आहे, असा निर्णय त्या बटालियनने घेतला. व्हायटलीला पळून जाण्यासाठी वेळ नव्हता. त्याने त्याच्या साथीदारांना सांगितले की तो स्फोट करणार आहे आणि काही सेकंदात त्यांनी स्फोटाचा आवाज ऐकला. त्यानंतर सैनिक दलाने पुलाजवळ व्हायटलीच्या मृत्यूच झाल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments